आम्ही भारतीय ललना, नवज्ञानाच्या संवेदना ।
नव्या जुन्या संकृतीने घडवू, युग हे विज्ञाना ।। १।।
घाबरू कधी ना कुणा, आम्ही भारतीय ललना ।
चालत राहू सन्मार्गाने मागे वळू ना पुन्हा ।।२।।
मा जिजा, अहिल्या, ताराराणी यांच्या वारस आम्ही ।
घेतला वसा जो पूर्ण कराया येऊ त्यांच्या कामी ।।३।।
जग जिंकू हे प्रेमानी, दे शक्ती माय भवानी ।
बनूनिया धार, करुनिया वार, ही नष्ट करू दुष्मनी ।।४।।
होऊनिया किरण, कल्पना, उगवती ‘उषा’ ।
बेधुंद जगू त्यांच्यासम, चढूनी पराक्रमाची नशा ।।५।।
गिरीशिखरे, हिमनग ओलांडूनिया स्पर्श करू आकाशा ।
ध्वज उंच उभारू मातृभूमीचा, उजळुनी दाही दिशा ।।६।।
आम्ही जग तो माता, भगिनी, गृहिणी यांच्या रूपातूनी ।
त्यागात प्रेम, सुख-शांती विलसे सोशिकता येऊनी ।।७।।
या मिळूनी साऱ्याजणी, शक्ती एकसंघ होऊनी ।
लढूनिया अमानुषतेला पळवू, होऊनिया मर्दानी ।।८।।
नुसत्याच न या कल्पना, त्या पूर्ण कराया जीवन लावू पणा ।
उधळीत रंग, ज्वाळा, तरंग, क्रांतीचे निशाण लावू गगना ।।९।।
नशीबी चूल-मूल हे जरी, झेलूनी आव्हाने कितीतरी।
जगी मानवतेच्या आम्ही उपासक
“भारतीय नारी” ।।१०।।
*
वाचा
ललित
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
चित्रकथा
कविता
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!