झाडीबोली भाषेतील म्हण:
येल पाडीच आलं डोरं
अना बाज टाकून खाल्या लोरं
म्हणीचा अर्थ:
अतीलाडाने वाया जाणे.
एखादी व्यक्ती किंवा बहुतेक वेळा मुलगी, अती लाडाने वेडेवाकडे काम करत असेल तर तीला ‘येल पाडीच आलं डोर अना बाज टाकून खाल्या लोर’ ही म्हण ऐकवून हटकले जाते.
शब्दार्थ :
येल – लाड
डोरं – डोळे
बाज – खाट
खाल्या – खाली जमिनीवर
लोर – लोळणे
ज्यावेळी आया-बाया, पोरी-सोरी पिंगा खेळतात, त्यावेळी या म्हणीचे गाणेसुद्धा गायले जाते. ते गाणे पुढीलप्रमाणे:
“माझ्या पिंगाचं आलं डोरं
बाज टाकून खाल्या लोरं ||
माझ्या पिंगाsss
गेल्या गावा
खाल्लन लावा ||
माझ्या पिंगाsss
गेल्या येशी
दोवलन भसी ||
माझ्या पिंगाsss
(महाराष्ट्राच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग ‘झाडीमंडळ’ किंवा ‘झाडीपट्टी’ या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ‘झाडीबोली’ या नावाने प्रचलित आहे.)
– कुंजीराम गोंधळे
***
वाचा
लेवागण बोली
कोरकू
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
‘बायजा‘ – कादंबरी
कथा
कुंजीराम जनार्धन गोंधळे हे भंडारा जिल्ह्यामधे लाखांदूर येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेमधे सहायक शिक्षक म्हणून काम करतात.