चित्राक्षरे

चित्राक्षरे काय आहे?

पाहणं, ऐकणं, वाचणं, बोलणं आणि वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सहभाग घेणं, या सगळ्या गोष्टी आपली जगण्याची लय निश्चित करतात. आपण विचारांनी, आचारांनी कोण होणार, हे ठरवतात. थोडक्यात आपले ‘व्ह्यूज’ निश्चित करतात.

तुमच्या जगण्यातही काही व्ह्यूज असतील. तसे ते प्रत्येकाच्या जगण्यात असतातच. हे व्ह्यूज तयार होण्यात थोडासा सहभाग देता यावा, म्हणून चित्राक्षरे हे व्ह्यूज पोर्टल! जिथं पाहता येईल, ऐकता येईल, वाचता येईल आणि प्रत्यक्ष सहभागी होऊन धमाल करता येईल.

‘चित्र’ आणि ‘अक्षर’ हे चित्राक्षरेचे दोन भाग!

चित्र :
दृश्यकलेच्या अनुषंगानं जे काही आहे, ते सगळं ‘चित्र’ या पहिल्या भागात असेल. त्यात चित्रं, छायाचित्रं, इलस्ट्रेशन्स असं खूप काही असेल. शिवाय, चित्रपट आणि इतर दृश्य कलांशी संबंधित लेख असतील. वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओजसुद्धा असतील. शिवाय, चित्र आणि अक्षरे या दोन्ही विभांगांमधील निवडक मजकूरसुद्धा व्हिडिओ फॉर्ममध्ये उपलब्ध असेल.

हे सगळे व्हिडिओज चित्राक्षरेचे सहयोगी असलेल्या ‘गोष्ट क्रिएशन्स’ या यूट्युब चॅनेलवर बघता येतील.

चॅनेलचे अपडेट्‌स
मिळवण्यासाठी
सबस्क्राइब करा.

अक्षर :
लिखाण-वाचनाच्या अर्थात साहित्याच्या अनुषंगानं जे काही आहे, ते सगळं ‘अक्षर’ या दुसऱ्या भागांत असेल. त्यात साहित्याच्या बहुतेक सगळ्याच फॉर्ममधलं म्हणजे, कथा, कादंबरी, कविता, ललित लेख, वैचारिक लेख असं लिखाण असेल. तसंच वाचक आणि लेखक म्हणून थेट प्रत्यक्ष सहभागही नोंदवता येईल अशाही भन्नाट गोष्टी असतील.

चित्राक्षरेचे अपडेट्‌स
मिळवण्यासाठी
पोर्टलला सबस्क्राइब
करा.

Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

1 Comment

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :