गोष्ट क्रिएशन्स

जिवंत राहण्यासाठी
माणसं
माणसांना गोष्टी सांगतात…

ही ‘गोष्ट क्रिएशन्स’ची टॅगलाईन!

गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं, या निसर्गदत्त गुणामुळंच माणूस आज माणूस आहे. आपल्या जगण्याचा एकूण विकास आणि अधोगतीसुद्धा याच एका कलेमुळं झाली आहे. आम्हाला विश्वास आहे, एकदा कधीतरी या गोष्टी सांगण्याच्या कलेवरच माणूसजात कायमची पक्की आणि आदर्श होऊन जाईल. या पक्क्या धारणेतूनच ‘गोष्ट क्रिएशन्स’चं चित्रभाषेतून गोष्टी सांगण्याचं काम सुरू झालंय.

‘गोष्ट क्रिएशन्स’नं सांगितलेल्या गोष्टी:

१) बबई:

‘गोष्ट क्रिएशन्स’ची ही पहिली गोष्ट. साडे तेरा मिनिटांच्या या शॉर्ट डॉक्युमेंटरी फिल्मला जगभरात ३५ पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेत. शिवाय हैदराबादच्या तेलंगणा विद्यापीठाच्या पदवी शिक्षणासाठीच्या अभ्यासक्रमातही ‘बबई’चा समावेश केला गेलाय. अनेकांना भावलेली ही ‘बबई’ शॉर्ट डॉक्युमेंट्री ‘गोष्ट क्रिएशन्स’च्या यूट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे.

बबई | दिग्दर्शक: कविता दातीर, अमित सोनावणे

२) गिरकी:

‘गोष्ट क्रिएशन्स’ची दुसरी गोष्ट. हा पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट असून सध्या तो पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. लवकरच ही गोष्ट सर्वांसमोर उलगडतोय.

संपर्क :
इमेल : [email protected]
समाज माध्यमांवर फॉलो करण्यासाठी:

Website | + posts

चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :