Anuya-kulkarni-marathi-kavita-chitrakshare-marathi-sahitya-yourquote-yq

आभाळ असं भरून आलंय
नि तू असा पाठमोरा
काळजात बरसतंय…

नाहीच पार होत कधी
तुझ्या-माझ्यातलं,
हे हातभर अंतर…
काळीज भिजतं नि
मन, कोरडं होत जातं…

आभाळ असं भरून आलंय
तुझ्या आत
माझ्या आत
… तुझ्या माझ्या
दोघात…
… उरात थोडं
… दारात थोडं
…. थोडं अधिकच
दाटून आलंय
कुठंतरी दूर
वाहतोय
कोंडलेल्या श्वासांचा पूर…

*

वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता

कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी


+ posts

मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.

2 Comments

  1. अनुया कुलकर्णी

    धन्यवाद चित्राक्षरे 🙏

  2. Avatar

    खूपच सुंदर ताई

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :