जसा तुला मी सुचतो..

raj-mahore-marathi-prem-kavita-jasa-tula-mi-suchato-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-status-for-wifes-birthday-bayakosathi-preyasisathi

गुंतलो तुझ्यात इतका स्वतःसही मी स्मरत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही…

आरशासमोर उभा मी प्रतिबिंबात हसतेस तू
होता नजरानजर स्वतःशीच लाजतेस तू
तुझ्याकडे पाहताना पापणीही मिटत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही

चांदण्या रात्रीतला मंद तेवता प्रकाश तू
माझ्या अंतःमनाला होणारा एक भास तू
तुझ्या मोहापायी ही रात्रही निजत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही

माझ्या वेड्या शब्दामधली अथांग कविता तू
अबोल तरीही उत्कट भावनांची प्रतिभा तू
वगळता तुला माझ्यातुनी मी मलाच रुचत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही

भाबड्या कल्पनांचा निशब्द हुंकार तू
छेडता तार मनीची उमटणारा झंकार तू
गीत तुझे गुणगुणताना मी माझा उरत नाही
जसा तुला मी सुचतो माझा मलाही सुचत नाही

*

वाचा
राज माहोरे यांचं साहित्य
कविता
समाजकारण
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


+ posts

राज माहोरे हे प्रहार संघटनेचे तिवसा तालुका प्रमुख असून गेल्या वीस वर्षांपासून ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. तसेच ते ना. बच्चू कडू यांचे विश्वासू कार्यकर्ते असून सामाजिक व राजकीय उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :