तुला जरी मी कळलो नाही
तुझ्या पासुनी ढळलो नाही
नकार आला तुझा कितीदा
पण माघारी वळलो नाही
निमुटपणाने सोसत गेलो
कधी कुणावर जळलो नाही
जे जे नाही मला मिळाले
त्यासाठी हळहळलो नाही
ओठ चुंबिले झोपेमध्ये
पुन्हा कधी पाघळलो नाही
चोरुन चोरून सारे केले
कुठे कुणा आढळलो नाही
स्वच्छ ठेवले तुला, जगाला
आणि स्वतःही मळलो नाही
*
वाचा
अशोक थोरात यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी