भारलेली साथ होती… पावसाळी रात होती
कोवळे वय आपुले अन्… कोवळी बरसात होती
पावसाचे थेंब होते, मेघही हाकेत होते
रंगलेली रात होती, रातराणी गात होती
स्वप्न ओले, भाव ओले, श्वास होते भारलेले
चिंब भिजल्या गारव्याने उधळली खैरात होती
रोमरोमांना बिलगले, स्पर्श ओले लाजणारे
धडकणाऱ्या काळजाची स्पंदने तालात होती
मी न माझा आज उरलो, अंतरंगी मी बहरलो
रोमरोमांच्या महाली रंगली मधुरात होती!
*
वाचा
व्यंकटेश कुलकर्णी यांच्या कविता
कविता
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
बायजा – कादंबरी
कथा
व्यंकटेश कुलकर्णी हे कृषी क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत ते मार्केटिंग हेड म्हणून कार्यरत आहेत. कवी, गझलकार, गीतकार, नाटककार, संगीतकार, ललित लेखक म्हणूनही त्यांची ओळख आहे. फोटोग्राफी या क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली असून ते नियमितपणे ब्लॉग लेखन करतात.
वा, सुंदर कविता आहे! 👍