जीवनाच्या संध्याकायी

chitrakshare-marathi-kavita-madhuri-chaudhari-levaganboli-jivanachya-sandhyakayi-goshta-creations-saarad-majkur-andres-f-uran-unsplash

जवा जवा तू माह्या हात हातात घेती
खरज तू मले इझनाऱ्या मेनबत्तीच्या वातीसारखीज दिसती

समदं आयुष्य मी पाऊस बनीसन धोधो पळला
अन तुनज ढग होइसन मले पाऊस पुरोयला

जींदगीभर गाळी, जमीन-जुमला कमोइसन बी मी खालीज राह्यतो
फडदाळ्यावरच्या डब्ब्यातली तूही मुठभर शिरमंती मी डोयेभरी पाह्यतो

पैसा पैसा करत मी पैश्यायमागे पयत गेला
नातलगायचा फकस्त तुनज ईचार केला

माह्या खांद्यावर डोकं ठिसन तुह्यं पुरं आयुष्य गेलं
तुह्या डोयातलं पानी मले जग्याची ताकद देत गेलं

खरज सांगतो तुले मी दिया झालतो
पन वात बनोइसन मी तुले बायत व्हतो

*

वाचा
माधुरी चौधरी यांच्या कविता
कविता

कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
चित्रकथा


+ posts

माधुरी चौधरी यांचे 'मधुज मेलॉडी' व 'माह्या जगन्याची ताकद' हे काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या 'माय मराठी साहित्य परीषदे'च्या संस्थापक व 'आम्ही लेखिका'च्या औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आहेत. 'गुरूनाथ फाउंडेशन जळगाव'चा 'बहिणाबाई पुरस्कार', 'कवि मित्र संस्था, पुणे'चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार, 'हिरकणी संस्था, जालना'चा 'हिरकणी पुरस्कार', 'प्रेरणा फाउंडेशन, बदलापूर'चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार', 'मातोश्री फाउंडेशन'तर्फे 'कर्तबगार महिला' सन्मान, 'विश्वशांति संस्थे'चा शिक्षण क्षेत्रासाठी विशेष सन्मान, 'सेवक सेवाभावी संस्थे'चा 'हिरकणी' पुरस्कार, 'लेवा पाटीदार बहुउद्देशीय मंडळ, जालना'चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :