खिडकीजवळ उभं राहून
आकाशातल्या चित्र विचित्र ढगांचे
आकार बघताना किंवा
थांबलेला काळा कुळकूळीत रस्ता
न्याहळताना
उगीचच त्यातला एक हळवा ढग
डोळ्यांत दाटीवाटी करतोय..
तसं हा रस्ता किंवा हे ढग
मी रोजच पाहातो या खिडकीतून
पण
आज ते दोन्हीही नवीनच वाटतायत..
तसं हा रस्ता वाहता
पण आज थांबलाय
एक एक ढगही अलग अलग होतायत
काहीतरी हातातून निसटून जाताय असं वाटतंय
आकाश मोकळं होतंय
शांततेचा प्रवाह मुळासकट उन्मळून पडतोय
आणि मी मात्र
आधार शांततेचा शोधतोय
या काळ्या थांबलेल्या रस्त्यात आणि
पुढं पुढं सरकत जाणाऱ्या
चित्र विचित्र ढगांच्या तुकड्यात…
– शरद कवठेकर
*
वाचा
शरद कवठेकर यांच्या कविता
कविता
कथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!