झाडीबोली भाषेतील म्हण:

घरच्यालं देवा देवा,
बाहेरच्यालं चोरी सिवा

म्हणीचा अर्थ:
घरच्यांचा मान न राखता बाहेरच्यांना सन्मानाने वागवणे.

एखादी व्यक्ती किंवा बहुतेक वेळा मुलगी, अती लाडाने वेडेवाकडे काम करत असेल तर तीला ‘येल पाडीच आलं डोर अना बाज टाकून खाल्या लोर’ ही म्हण ऐकवून हटकले जाते.

शब्दार्थ :
देवा देवा : दुर्लक्षिणे, काखा वर करणे, टाळणे, वगळणे.
चोरी : चोळी
सिवा : शिवणे

(महाराष्ट्राच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांचा भूभाग ‘झाडीमंडळ’ किंवा ‘झाडीपट्टी’ या नावाने ओळखला जातो. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली ‘झाडीबोली’ या नावाने प्रचलित आहे.)

लेखक: कुंजीराम गोंधळे

***

वाचा
लेवागण बोली

कोरकू
कविता
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
बायजा
– कादंबरी
कथा


+ posts

कुंजीराम जनार्धन गोंधळे हे भंडारा जिल्ह्यामधे लाखांदूर येथील जि. प. उच्च प्राथमिक शाळेमधे सहायक शिक्षक म्हणून काम करतात.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :