‘बिल्बी’ ही मैत्रीची गोष्ट आहे.. एकमेकांना जपण्याची, एकमेकांवर प्रेम करण्याची गोष्ट आहे.
ही कथा घडते ऑस्ट्रेलियामधल्या एका दुर्गम प्रदेशात. ‘बिल्बी’ हा ऑस्ट्रेलियामध्ये आढळणारा एक पक्षी आहे. बिल्बीचं एक नवजात पिल्लू अशा एका दुर्गम भागामध्ये एकटं पडलं आहे. त्याला अजून पंखसुद्धा फुटलेले नाहीत. त्याला ना स्वतःची काळजी घेता येते, ना इतर प्राण्यांपासून स्वतःचं संरक्षण करता येतं.
अशामध्ये अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या एका कांगारूची बिल्बीशी गाठ पडते. गाठ कसली, ती खरं तर असते साधी भेट. भेट होते योगायोगानं, पण बिल्बी कांगारूची पाठ सोडायचं नाव घेत नाही. ते जिथं जाईल तिथं त्याचा पाठलाग करत राहतं. बघता बघता कांगारूंचासुद्धा बिल्बीमध्ये जीव जडतो आणि दोघांची घट्ट मैत्री होते.
ही मैत्री दोघांना कुठं कुठं घेऊन जाते, काय काय अनुभव देते त्याची ही छोटीशी आणि गमतीशीर गोष्ट!
*
कविता दातीर या गोष्ट क्रिएशनच्या संचालिका असून कवयित्री आणि चित्रपट दिग्दर्शिका आहेत.