तू थंडी थंडी म्हणतोस…

तू थंडी थंडी म्हणतोस,
तेव्हाच मला थंडी वाजते
खरं तर तुझ्या कुशीत
चांदणेही पेट घेते…

संध्याकाळची गार हवा
अंग मी चोरून घेते
तुझ्या डोळ्यातली ऊब
माझा हिवाळा पिऊन घेते

उत्तरात्री अंगावरची
जाड रजई फेकून देते
गार गोठल्या हवेला
तापल्या अंगाचे स्पर्श देते

तू थंडी थंडी म्हणतोस
तेव्हाच मला थंडी वाजते…

*

वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता

कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची – गीतांजली जोशी
‘महाडचे दिवस’ – कादंबरी

+ posts

मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :