दिस थकवून गेला
रात विसावे देहात
आस चुकवी मनाला
आणि झिरपे डोळ्यात!
काठोकाठ पापणीची
मिळे आशेला सावली
शीड धरते काळोखी
पारा धरेचा पाऊली!
गूढ रांगोळी ही कशी
रेखे पुसे चकवीत
कधी रिमझीम चांदण्या
कधी वादळ प्रमत्त!
एक चित्रफीत जणू
पुढे सरके ओळीत
आशयाचे शब्द फिके
पेरी मुग्धता दिठीत
दिठी उघडून जरा
हात लावते अंमळ
होई दिसेनासे क्षणी
पारा स्वप्नाची पातळ!!
अभ्र विरघळावे तसे
विरे स्वप्न मृगजळ
जागेपणी आकांक्षांचा
असा वितळे कातळ!!
*
वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची – गीतांजली जोशी
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.