तुका

chitrakshare-marathi-kavita-sudesh-ingale-tukaram-bij-goshta-creations-saarad-majkur-soneri-kalavit

सवंगडी तुका
माझ्यावत राठ
पृथ्वीवर मठ
नको त्याचा

अनुयायी थोर
माजीयले फार
जगद्गुरु भार
तुक्यावर

सावळा अलख
नागडा अभंग
आधार भणंग
एकमेका

मातीचा तुकोबा
लाकडाची वही
संगमरौरी फक्की
नको त्याला…

*

वाचा
सुदेश इंगळे यांच्या कविता

कविता
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
बायजा
– कादंबरी
कथा


Website | + posts

मी सुदेश इंगळे. अक्षर मानव प्रकाशनातर्फे माझे 'उगाच काही तरी' (२०१५), 'काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट' (२०१८) आणि 'निम्म्या रेषांचा अपरिग्रह' (२०२०) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या मी 'परिसर फाउंडेशन' ही संस्था चालवत आहे. ही संस्था उस्मानाबादमधील ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'च्या उस्मानाबाद कमिटीचा मी अध्यक्ष असून त्यायोगे विद्यार्थी चळवळीशीदेखील जोडलेला आहे.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :