आपण आयष्यात पहिल्यांदा पेन्सिल हातात धरतो, ती कुठली भाषा लिहिण्यासाठी किंवा कुठलं गणित सोडवण्यासाठी नाही, तर आपल्या बालमनातल्या वेगवेगळ्या कल्पना रेखटण्यासाठी! आपण मनात येईल ते रेखाटत जातो, उभ्या-आडव्या रेषा आखत जातो!!
चित्रकला ही लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांसाठी असणारी अशी एक कला आहे जी मनातल्या वेगवेगळ्या कल्पना, इच्छा, अनुभव केवळ एका पेपरवर उतरवू शकते.
आजपासून आपण सगळे लॉकडाऊनमधे आहोत. बाहेरची परिस्थिती एवढी वाईट आहे की अशा परिस्थितीमध्ये घरात प्रत्येक जण एकमेकांकडे घाबरलेल्या नजरेनं बघत जगत आहे. घरात बसून कितीही हसण्याचा, मन रमवण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असला तरी मनात भीतीचं काहूर आहेच. ही भिती मुलांपर्यंत पोहोचू नये म्हणून आपल्या चिमुकल्यांना कशात न कशात गुंतवण्याचा प्रयत्न आपण करतोय. पण जर ही गुंतवणूक आपण कलेत करु शकलो, तर भन्नाट कल्पना किंवा मनातल्या भावना आपली मुलं कागदावर रेखाटण्याचा प्रयत्न करतील.
आणि नेमका हाच विचार घेऊन मी खास लहान मुलांसाठी घरबसल्या एक वर्कशॉप घेत आहे. या वर्कशॉपसाठी विषय मुद्दामच ‘निसर्ग’ हा निवडला आहे. ज्या वयात आपल्या चिमुकल्या मुलांनी बाहेर बागडायला हवं, मोकळ्या हवेत खेळायला हवं, त्या वयात त्यांच्यावर बंधनं आली आहेत. परिस्थिती इतकी वाईट आली आहे की चार भिंतींच्या आड त्यांचं बालपण हरवत चाललंय की काय अशी भिती वाटू लागली आहे. म्हणून, घरबसल्याच मुलांना निसर्गामधे फेरफटका मारुन आणायची ही कल्पना!
पालकहो,
चला तर मग..
वाट कसली बघताय?
मुलांना त्यांच्या आवडीच्या कामात रमवूया…
त्यांचे दोन तास साजरे करुया…
तेही अगदी माफक दरात!
*
वाचा
स्वाती महाले यांचे लेख
कविता
चित्रकथा
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!