मी कोण, हा प्रश्न स्वतःला कधी विचारावा वाटला नाही. किंवा कुणी विचारलं तरीही त्याचं नेमकं उत्तर माझ्याकडे कधीच नसतं. मी स्वतःला बिनचेहऱ्याचा माणूस समजतो. मनात खूप संकोच भरलाय. अगदी ठासून. मी जो काही आहे, तो या संकोचामुळंच. आणि जो नाही, तोही या संकोचामुळंच. ‘आय ॲम अ प्रॉडक्ट ऑफ संकोच.’, असं मी स्वतःलाच सांगत असतो. पत्रकार झालो खरा. पण ती ओळख मिरवावी वाटली नाही कधी. ती बाजूलाच ठेवत आलोय आजवर. मात्र यातूनच ‘सारद मजकूर’ हे स्वप्न आकाराला आलं. ते काय आहे, ते मला प्रत्यक्ष ऐकवायला आवडेल. एक आहे, छापील शब्दांवर माझा जबरदस्त विश्वास आहे. म्हणून तर शब्दांच्या माध्यमातून अनेकांची ओळख टिकून राहावी, असं मला वाटत आलंय. मला मात्र अनोळखी राहायचंय.
कायमच.
संपर्क :
इमेल : [email protected]
समाज माध्यमांवर फॉलो करण्यासाठी:
चित्र आणि अक्षरांचा खजिना म्हणजे 'चित्राक्षरे'!
खुप छान लिहिले आहे सर.
वा!
Khup chaan…