हे नुसतं चित्र नाही तर ही एक कथा आहे. चित्रात एक मुलगी दिसतेय, ती निराशेनं, एकल अशी बसलीय. तिच्या आजूबाजूला न सुटणाऱ्या प्रश्नाचं एक नाही तर असंख्य वर्तुळं आहेत. या वर्तुळातून बाहेर यायचं कसं या शोधात ती दिसते आहे. हे चित्र मी स्पष्ट करून सांगितलं खरं पण ते सांगायलाच हवं. अमृता देसर्डा यांची पायजमावाला ही कथा वाचली आणि मी पूर्वी काढलेलं हे चित्र आठवलं.
कथेत एक मुलगी आहे, खूप लहान. तिच्या पाठी एक पुरुष लागलाय. एकटी बघून तो तिला गाठू पाहतोय. त्यातून ती आतून भेदरली आहे. हे असं एकल भेदरलेपण आहे की जे कुणाला सांगताही येत नाही. वरवर मजेत असणारी, तसं दाखवणारी ही छोटुली आतून मात्र अशीच खोल खोल गर्तेत सापडली असेल, असंच मला ही कथा वाचताना वाटलं!
हे चित्र या गोष्टीचंच वाटलं. माझंच चित्र मला या कथेत सापडलं. त्यामुळं या कथेला हे चित्र मी दिलंय.
हे चित्र कथेचं म्हणून पाहिलं तेव्हा झालं ते खूप दुःख…
कारण कथेत असणाऱ्या छोटुलीचं भेदरलेलं मन माझ्या आसपास घुटमळत होतं. बराचवेळ!
हे चित्र समजून घ्यायचं असेल तर ही मूळ कथा आवर्जून वाचायला हवी, असंच मी सुचवेन.
*
वाचा
चित्रकथा
कथा
कविता
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
शब्दांची सावली (अमृता देसर्डा)
मी मयुरी. व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. मी नाशिक चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेचं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 'व्हिडीओ प्रोडक्शन'चं शिक्षण पूर्ण केलं आहे. पुढे मराठी 'टीव्ही-फिल्म इंडस्ट्री'साठी विविध कामं केली. जसे की, 'फिल्म्स'च्या कला-वेशभूषा विभागांसाठी काम करणं, 'कौन बनेगा करोडपती' व 'पाणी फौंडेशन' आयोजित 'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे'साठी 'फिल्ड डायरेक्टर' म्हणून काम करणं इ.
अप्रतिम मयुरी.
कथा माहीत नसतांना ही अगदी स्पष्ट व्यक्त होत आहे एका मुलीची व्यथा…ह्या चित्रा क्षरे मार्फत…..आणि खरच वाचल्यावर अजून उलगडेल…Thanks Mayuri….
Thankyou Namu