‘वटपौर्णिमा’ या सणाबद्दलचं एक विचित्र चित्र कित्येक वर्षांपासून डोक्यात घोळत होतं. यंदा ते पूर्ण झालं.
‘संसार’ नावाच्या व्यूहामध्ये पुरती अडकलेली बाई, हे चित्र काही नवं नाही. जुनंच आहे. शतकानुशतकं जुनं. या व्यूहाविषयी फार उत्सुकता वाटते मला. अनेक प्रश्न पडतात मनात. जसे की.. या व्यूहामध्ये बाई अडकते म्हणजे नक्की काय घडतं? कोण रचतं हा व्यूह? कोण अडकवतं तिला? की ती स्वतःच स्वतःला अडकवून घेते? वडाभोवती धागे बांधता बांधता, स्वतःभोवतीसुद्धा गुंडाळत जाते एकेक धागा? असं करकचून बांधून घेण्याव्यतिरिक्त खरंच दुसरा काही पर्याय नसतो तिच्यापुढं? की दुसरा पर्याय शोधण्याच्या, नवा पर्याय निर्माण करण्याच्या फंदातच पडायचं नसतं तिला?
की असं बांधलं जाणं, हे एक संमोहन असतं? वर्षानुवर्षं ती दोरे गुंडाळत राहते.. घुमत राहते, कधी स्वतःभोवती, कधी संसाराभोवती.. आणि कालांतरानं घुमत राहणं हीच जगण्याची लय वाटायला लागते तिला. गुंतणं, गुरफटणं हेच आयुष्य होऊन बसतं तिचं… चहूबाजूंनी गुंतून घेत घेत कधी तिचं पाऊल या सगळ्याच्या केंद्रभागी कधी येतं ते तिचं तिला पण उमजतही नसतं. आणि उमजलंच चुकून, तरी त्यातून पडण्याची सोय तरी कुठं असते? या गुंत्याचंच हे चित्र. जुन्याच जगण्याचं नवं चित्र.
*
वाचा
चित्रकथा
कथा
कविता
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
शब्दांची सावली (अमृता देसर्डा)
मी मयुरी. व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. मी नाशिक चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेचं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 'व्हिडीओ प्रोडक्शन'चं शिक्षण पूर्ण केलं आहे. पुढे मराठी 'टीव्ही-फिल्म इंडस्ट्री'साठी विविध कामं केली. जसे की, 'फिल्म्स'च्या कला-वेशभूषा विभागांसाठी काम करणं, 'कौन बनेगा करोडपती' व 'पाणी फौंडेशन' आयोजित 'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे'साठी 'फिल्ड डायरेक्टर' म्हणून काम करणं इ.
चित्र मस्त आणि त्या मागची कथाही! 😊
खूप छान! नवीन विचारच नवीन नशिब घडवितात
एखाद्या झाडाचं वय त्याच्यावर असलेल्या वालयांवरून ओळखलं जातं तीच वलय एखाद्या स्त्री ला आपल्यात गुरफटून घेतात त्यात वय नाही पण काळ आणि काळानुरूप आलेल्या प्रथामधून जखडलेपणाची भावना या लघु लेखातून आली. अतिशय सुंदर रेखाटन आणि विचार.
धन्यवाद शैलेश
धन्यवाद खूपच मार्मिक शब्दांत व्यक्त केले आहेस.
खूप लहान लेख आणि विषय वाटला सुरुवातीला,.
पण अतिशय आशयसमृद्ध आणि आत्मचिंतनीय.
You are most talented person with good human bin.. all the best for bright future dear..
खूप छान मयुरी. कमी शब्दात खूप मोठा विषय मांडला तू. शुभेच्छा तुला !!
छान विषय आहे मयुरी .
हा गुण मला माहित नव्हता….. खूप छान मयुरी… खूप खूप शुभेच्छा मयुरी..
धन्यवाद राजेश सर
गोल गोल …. खरचं असेच गोल फिरत फिरत कधी केंद्र बिंदू पर्यंत जातो उमतच नाही..अप्रतिम मयुरी सुंदर आहे चित्र आणि त्यामागे दडलेले अक्षर…👌
Boht भारी hai re, वजनदार .
By the way… sirf Aurat hi nahi, har insaan iss संसार me fansaa hua hai.
Waise boht shandar lekh hai👌🏼👍🏼
Thank you jayant dada
छान कथा आहे मयु
धन्यवाद सुवर्णा
Saral sopp Ani mast
धन्यवाद वर्षा
फारच, वैचारिक आहे. वेगळ्या नजरेतून आपणच आपल्याला बघतो आहोत असं जाणवलं. नावं सुद्धा खोल अर्थाने भरलेलं. चित्राक्षरे कशी आणि काय सांगतात, हा विषय कमल शेडगे यांच्या वरचा लेख वाचला आणि समजायला लागलं, आणि याबद्दलच औत्सुक्यहि वाढलं त्यामुळे वरील ‘संसार ‘ चा व्यूह व त्यात बाईच गुरफटत जाण…. फार विचार करायला लावणार वाटलं.
धन्यवाद मॅम
सुंदर मतितार्थ… वलय गुंफताना किंवा गुंतून जाताना केंद्रस्थानी येण महत्त्वाचे
Nice illustration Mayuri
सुंदर लिहिलं आहे 👌
सुंदर