दोन-अडीच महिन्यांची गरोदर होती ती.
एका दुपारी घरात एकटीच असताना अचानक पोटात दुखायला लागलं तिच्या. भयंकर कळ येऊन जमिनीवर पडली. त्या वेदना एवढ्या भयंकर होत्या की कुणाला हाकसुद्धा मारायचं तिला सुचलं नाही. सुचलं असतं तरी तेवढं अवसान नव्हतं तिच्यात. विव्हळत पडून राहिली बराच वेळ.
मग वेदना थांबल्या. त्राण नव्हतंच, तरी हालचाल केली जराशी. आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केला. पाहते तर समोर दिसला रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेला गर्भ! आणि भोवळच आली तिला!
काही वेळानं भानावर आली. काय करावं ते उमजेना. आईला फोन लावला.
आई म्हणाली, ‘मी येते लगेच. तू आराम कर.’
ç गोंधळली, ‘पण.. या सगळ्याचं काय करू?’
आई म्हणाली, ‘पुसून टाक…’
तिनं ते सगळं जमेल तसं ओंजळीत उचललं. अंगणात आली. आणि सोनचाफ्याच्या मुळाशी ओंजळ रिकामी केली.
आज जवळपास ५ वर्षांनी त्या चाफ्याला पहिलं फूल आलं आहे!
*
वाचा
चित्रकथा
कथा
कविता
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
शब्दांची सावली (अमृता देसर्डा)
मी मयुरी. व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. मी नाशिक चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेचं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 'व्हिडीओ प्रोडक्शन'चं शिक्षण पूर्ण केलं आहे. पुढे मराठी 'टीव्ही-फिल्म इंडस्ट्री'साठी विविध कामं केली. जसे की, 'फिल्म्स'च्या कला-वेशभूषा विभागांसाठी काम करणं, 'कौन बनेगा करोडपती' व 'पाणी फौंडेशन' आयोजित 'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे'साठी 'फिल्ड डायरेक्टर' म्हणून काम करणं इ.
Speechles ! गर्भगळीत ते चाफेकळीत चा भन्नाट प्रवास आणि अप्रतिम चित्र.
Apratim Mayuri
Thank youu
चित्र आणि त्या मागची कथा संवेदनशील आहे.
Thank youu
मयुरीचं चित्र आणि चित्रकथा दोन्ही मनाचा थरकाप उडवणारंं होतं. कधीकधी काय सांगितलंय ह्यापेक्षा काय वगळलंआहे हे महत्वाचं असतं शेवटची पंच लाईन आणि नंतरची स्तब्धता सगळं व्यक्त करून गेली.
धन्यवाद 🙏
खुप छान मयू
Thank you pradnya tai
तू लिहिलेला मजकूर तुझ्या चित्रातून सहजपणे व्यक्त होतो आहे. पाठमोरी, पाय मुडपून काढलेली बाईची रेखाकृती तिच कळवळण, असहायता व तीची वेदना थेट मनापर्यंत पोचवते, मला तो पोटातल्या बाळाचा आकार सुद्धा वाटला. तिच्या पुढ्यात जे होत आहे ते तिला पाहावत नाही हे तिच लांबसडक केस डोक्यावरून पुढच्या बाजूला असणं स्पष्ट करत.
सारांश सिनेमात अनुपम खेर त्याच्या मुलाच्या अस्थि कुंडीत हळुवारपणे ठेवतो. काही दिवसांनी छान फूल येत -याची आठवण झाली. तिच्या नाळेच्या भागातून काढलेली एक उंच रेषा व त्याला आलेलं फूल नवीन आशाही दाखवतं. सगळं मनाला भावलं.
Thank you
मयुरी , किती सुंदर!!! बोलके चित्र आणि निःशब्द करणारी कथा !! ग्रेसच्या, ‘ झाडांशी निजलो आपण ,झाडात पुन्हा उगवाया ‘ ची आठवण झाली ! स्त्री ची गलितगात्र अवस्था आणि फुलाच्या रुपातला निसर्गाचा चिवट जीवटपणा !! फारच सुंदर!!
तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!!