chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-suhel-kazi-photographer-palikade
पलीकडे । सुहेल काझी । चित्रकथा

कबुतरं मनसोक्त उडत आहेत. दोन लहान मुलं त्यांच्या उडण्याचा आनंद घेत आहेत. ज्यांना उडायची इच्छा नाहीये, ते निवांत भिंतीवर बसले आहेत. ही भिंतीवरची मंडळी पण आपापलं चित्रातलं जगणं मनसोक्त जगत आहेत. कुणी खेळतंय… कुणी लढतंय… कुणी एकमेकांशी गप्पा मारतंय… कुणी काय करतंय, तर कुणी काय…

एकूणच संपूर्ण फ्रेममध्ये आनंद आहे. स्वातंत्र्य आहे. एक प्रकारचं चैतन्य आहे… मात्र भिंतीपुढचे हे सगळेच संदर्भ निव्वळ रंगवलेले वाटू लागतात, जेव्हा छायाचित्रकार म्हणून मला माहीत असतं, की ही भिंत पुण्यातल्या ‘येरवडा जेल’ची तटबंदी आहे…

*


वाचा
इतर ‘चित्रकथा’


+ posts

मी सुहेल. गेल्या दहा वर्षांपासून व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम करतोय. छायाचित्रांच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जगणं टिपायला मला आवडतं. आजपर्यंत मी दोन मराठी आणि एका हिंदी सिनेमासाठी छायाचित्रकार म्हणून काम केलंय. शिवाय, मूकबधीर आणि कर्णबधीर मुलांना छायाचित्रण शिकवलंय.

1 Comment

  1. जेलच्या भिंतीच्या पार्श्वभूमी वर स्वातंत्र्याचे उत्फुल्ल चित्र !! शेवटच्या वाक्याने पूर्ण चित्रातील भावाला कलाटणी मिळते!! फारच सुंदर! !

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :