satara-pune-photographer-suhel-kazi-chitrakatha-ek-paul-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-pune

गोव्याला फिरायला गेलो होतो. मला वेगळा गोवा बघायचा होता व टिपायचा होता. दिवसभर खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरल्यावर संध्याकाळी एका बीचवर आलो आणि हा फोटो तिथं मिळाला.

एक मुस्लीम स्त्री. वय साधारण ३५ ते ४०. अंगभर बुरखा, काळ्या रंगाचा. ती ज्या ठिकाणी उभी राहिली, ती जागा तिनं ठरवून निवडली नसेल; पण तिच्या त्या पोश्चरनं माझं लक्ष वेधून घेतलं...

तिच्या समोर समुद्रावरच्या दगडांचं एक वलय निर्माण झालं आहे. आणि या दगडांच्या पलीकडे दूरवर लोक मजा करत आहेत. लाटांचा आनंद घेत आहेत, पाण्यात भिजत आहेत. ही स्त्री त्या लोकांकडे तोंड करून उभी आहे आणि मागे सूर्यास्त होत आहे..

मनसोक्त जगणं आपल्यापासून फक्त एका पावलाच्या अंतरावर असतं. बदलसुद्धा फक्त एका पावलावर असतो. समाजानं आपल्यावर बंधनं घातली; पण ती काढून टाकणं, बंडखोरी करणं हेसुद्धा आपल्यापासून तेवढ्याच एका पावलाच्या अंतरावर असतं. आपलीच बदलायची इच्छा नसते. आपण आपल्याभोवती एक वलय निर्माण करतो आणि स्वतःला सांगतो की मला कधीही याच्या बाहेर पडता येणार नाही…

फोटो काढताना एवढी एकच गोष्ट डोक्यात होती. पण काढून झाल्यानंतर जेव्हा मी त्या फोटोचा पुन्हा विचार केला, तेव्हा इतर छोटे छोटे डिटेल्स मला दिसायला लागले. त्या बाईच्या अंगात बुरखा आहे.. ती अगेन्स्ट लाईट’ म्हणजेच सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध उभी आहे.. त्यामुळे ती सिलाउट दिसत आहे, म्हणजेच आणखीन काळ्या रंगात दिसत आहे.. दगडांच्या वर्तुळामुळे फोटोचे दोन भाग पडले आहेत. आणि त्यामुळे दोन वेगवेगळी जगं निर्माण झाली आहेत.. उरलेली सगळी माणसं दुसऱ्या जगात आहे.. तिच्या जगात मात्र ती एकटी आहे… आणि हे दुसरं जग, तिच्यापासून फक्त एका पावलाच्या अंतरावर आहे…!

*

वाचा
चित्रकथा
चित्रपटविषय लेख
कविता
कथा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव


+ posts

मी सुहेल. गेल्या दहा वर्षांपासून व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून काम करतोय. छायाचित्रांच्या माध्यमातून सामान्य माणसाचं जगणं टिपायला मला आवडतं. आजपर्यंत मी दोन मराठी आणि एका हिंदी सिनेमासाठी छायाचित्रकार म्हणून काम केलंय. शिवाय, मूकबधीर आणि कर्णबधीर मुलांना छायाचित्रण शिकवलंय.

1 Comment

  1. हो, खरय ! अंतर हातभरच असतं , पण नाही पार करता येत …. कारणं कधी आपली असतात तर कधी इतरांची, कधी परिस्थिती, तर कधी वलयांची … तर,कधी दिग्मूढता … एक ना दोन … पण मग हळूहळू आहे तेच अंगवळणी पडते , नाही तर तो दगडी बंधारा कोलमडून पडावा असा एक समुद्र समोरच्या समुद्रा वर उसळून गेला असता…

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :