आज दिनांक १ सप्टेंबर. हा दिवस ‘जागतिक पत्र लेखन दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं पत्र लेखनाविषयी काही गमतीशीर गोष्टी जाणून घेऊ.
१) ९० च्या दशकात रिचर्ड सिंपकिन यांनी जागतिक पत्र लेखन दिवस स्थापित केला. सिंपकिन यांना आपल्या मेलबॉक्समध्ये पत्र येउन पडलं की फार फार आनंद व्हायचं. या आनंदासाठी त्यांनी एक प्रोजेक्ट सुरु केला. काही मोठ्या माणसांना गाठून त्यांना त्यांच्या मुलाखती घ्यायच्या होत्या, त्यांचे फोटो काढायचे होते. अशा सिंपकिन यांनी हातानं पत्रं लिहून पाठवायला सुरुवात केली. उत्तरादाखल येणाऱ्या पत्रांची सिंपकिन मनापासून वाट बघत. आदरणीय असलेल्या मोठ्या माणसांची पत्रं येणं हा सिंपकिन यांच्यासाठी आनंदाचा जणू सोहळाच होता. या थोरा-मोठ्या माणसांच्या हातांचा स्पर्श झालेली पत्रं खरोखरीच अमूल्य होती. ते मोल डिजीटल पत्रांना येणे कधीही शक्य नाही.
२) प्रख्यात ग्रीक इतिहासकार हेलानिकस यांच्या नोंदींनुसार जगातील सर्वात पहिलं हस्तलिखित पत्र हे ५०० इसवीसन पूर्व परशियन रानी आटोसा व राजा साइरसची मुलगी हिच्या नावावर आहे. या पत्रानंतर असं म्हटलं जातं की साक्षरतेचं प्रमाण वाढत गेलं. संदेश देण्यासाठी पत्र एक उत्तम माध्यम आहे असं तेव्हा तेथील लोकांच्या लक्षात आलं व आपोआप लोकांचा साक्षरतेकडे कल वाढत गेला.
३) पूर्वीच्या काळी पत्रं लिहिण्यासाठी झाडांची पानं व साली यांचा वापर होई. इजिप्तमध्ये यासाठी पपायरसचा वापर केला जात असे. रोमन राजा क्लॉडियास यानं मजबूत पपायरसची निर्मिती केली. बघता बघता पपायरसची लोकप्रियता वाढत गेली व त्याची कमतरता भासू लागली. तेव्हा, प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेली वेललम व चर्मपत्रं हे लेखन साहित्य म्हणून वापरात आले.
४) त्या काळी लिहिण्यासाठी वापरला जाणारा पेन लाकडापासून किंवा धातूपासून बनवलेला असे. शाई म्हणून माश्याच्या स्त्रावाचा वापर केला जाई. त्या शाईमध्ये पेन बुडवून मग लिहिलं जात असे. ५ व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये हंसाच्या पंखांचा वापर लिखाणासाठी केला जाई. प्राचीन ग्रीसमध्ये लीड पेन्सिल वापरल्या गेल्या, पण फक्त काही प्रमाणात. या लेखन साहित्यांचा इतिहास पाहिला तर त्यांच्या उगमाचं श्रेय ग्रीक लोकांना द्यावं लागेल.
५) पूर्वी संदेश वाहनासाठी विविध पद्धतींचा वापर केला जाई. संदेश वाहकांकडे ही पत्रं पोहोचवण्याची जबाबदारी असे. अनेकवेळा या मोहिमांवर ही माणसं लूटली जात असत, त्यांच्यावर जीवघेणे हल्ले होत असत. त्यामुळे आज साधी-सोप्पी वाटणारी पत्रं पोहोचवण्याची ही कामं त्या काळात अतिशय जोखमीची कामं होती.
इसवीसन पूर्व ६ व्या शतकात पर्शियन एम्पेरीरनं म्हणजेच आताच्या इराणनं रिले पद्धतीचा अवलंब सुरु केला. यामध्ये घोडेस्वार घोडे घेऊन पत्र पोचवण्याच्या मोहिमांवर निघत. दर दिवसाला १०० टप्प्यांचं टार्गेट असायचं. ते पूर्ण करत एक एक टप्पा मागं पाडत मोहिम पूर्ण केली जात असे. या दीर्घ प्रवासामध्ये मध्येच घोडे थकत, प्रवासाला निकामी होत असत. अशावेळी घोडेस्वार जिथं कुठं असेल तिथं घोड्यांचा व्यापार करत. थकलेले घोडे विकून नवे घोडे खरेदी करत आणि पुन्हा प्रवास सुरु करत.
६) ग्रीक लोक या कष्टाच्या कामासाठी धावपटू व खेळाडूंची नेमणूक करत.
७) विलियम पेन यानं १६८३ मध्ये पेनिसिल्विया देशामध्ये टपाल कार्यालय सुरु केलं. हे जगातलं पहिलं टपाल कार्यालय.
८) दक्षिणेकडच्या राष्ट्रान्मध्ये संदेश वहनासाठी गुलामांचा वापर होत असे.
९) १८६० सालामध्ये ग्रेस बेडेल नावाच्या ११ वर्षांच्या मुलीनं आपल्या वडलांना म्हणजे खुद्द अब्राहम लिंकन यांना पत्र लिहिलं आणि त्यांना एक गमतीशीर सल्ला दिला. ग्रेसनं आपल्या पत्रात वडलांना लिहिलं, ‘जर तुम्ही तुमची दाढी वाढवली तर तुम्ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता जास्त आहे.’ अब्राहम लिंकन यांनी मुलीचं म्हणणं राखत दाढी वाढवली. योगायोग असा की ते पुढं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षसुद्धा झाले.
१०) जगातील सर्वाधिक लांबीचं पत्र लिहिण्याचं रेकॉर्ड हे ब्रूक्लीन न्यू यॉर्क मधल्या एका महिलेच्या नावावर होतं. पुढं हे रेकॉर्ड मोडलं गेलं, पण हे पत्र लक्षणीय होतं. हे पत्र लिहिलं होतं १९५२ मध्ये. तेव्हा कोरियन युद्ध चालू होतं. या महिलेनं सैन्यासाठी लढणाऱ्या आपल्या प्रियकराला हे पत्र लिहिलं होतं. ते लिहिण्यासाठी तिनं टेपचा वापर केला होता. त्या टेपची लांबी ३२०० फूट एवढी होती. आणि ते पत्र लिहायला तिला पूर्ण १ महिना लागला होता.
*
वाचा
आज दिनांक
समाजकारण
कथा
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
जयश्री नागपुरे या फिल्म व टीव्ही इंडस्ट्रीमध्ये गेल्या ९ वर्षांपासून लेखक व क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. टीव्हीसाठी डबिंग स्क्रिप्ट लिहिण्याचा व तसंच चित्रपट परीक्षणं लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे.
खूपच छान माहिती आहे👌🏽… आज what’s app ani बऱ्याच प्रकारच्या messenger source मुळे पत्रांचा वापर फार कमी होत आहे, सध्या तर पत्र official work साठी वापरतात त्यामुळे पत्राचा जास्त वापर पूर्वी प्रमाणे day-to-day Life मध्ये होत नाही आणि त्यामुळे पत्राचा इतिहास काय आहे हे New Generation ला माहितच नाही. पण THANK YOU SO MUCH To Dear Writer ज्यांच्या मुळे पत्र आणि पत्रचा इतिहासाबद्दल बरीच माहिती मिळाली. Nice Article 👍🏻👌🏽👌🏽
खूपच रोचक माहिती मिळाली.