प्रशिक्षण, प्रशिक्षण!
किती ही जरी शोध लावले आणि नवनवीन उपकरणे किंवा शस्त्रास्त्रे तयार केली, तरी त्याचा वापर जे करणार आहेत त्यांना प्रशिक्षण दिल्याशिवाय त्यांचा प्रत्यक्ष उपयोग होणार नाही. दुसऱ्या महायुद्धात राबवलेली मोठी वैज्ञानिक संकल्पना म्हणजे ‘वापरकर्त्यांचे प्रशिक्षण’. अमेरिकेत नवीन प्रोजेक्टर्समधून चलचित्राद्वारे आणि सिम्युलेटर वापरून सारे सैन्याला-सैन्यातील हजारो स्त्री-पुरुषांना या नव्या उपकरणाचा उपयोग कसा करावा याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. युद्धाचा शेवट झाला तेव्हा एका निराश नाझी जनरलने उद्गार काढले की तो आणि त्याचे इतर मित्र यांना जेवढ्या वेगाने अमेरिकन उद्योग युद्धामध्ये उतरले त्याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही; आश्चर्याचे होते की हे अमेरिकेने – अमेरिकन उद्योगांनी व अमेरिकन युद्ध यंत्रणेने – किती वेगाने आपल्या जनतेला प्रशिक्षित केले आणि आणि युद्ध जिंकले.
आजदेखील आपण हे पाहतो की अमेरिकन गेम इंडस्ट्रीसारखी नवनवीन युद्धाधारित गेम्स बनवत असते आणि त्यातून सैन्याला व जनतेला केवळ प्रशिक्षितच करत नाही, तर युद्धखोर वृत्तीदेखील निर्माण करते.
युद्धकाळात उदयाला आलेली आणखीन एक महत्त्वाची कल्पना म्हणजे ‘ऑपरेशन्स रिसर्च’. काही ब्रिटिश शास्त्रज्ञ युद्धाच्या सुरुवातीलाच अशा निष्कर्षाप्रत आले होते की नवनवीन शस्त्रे तयार करणे यासाठी बरेच प्रयत्न चालले आहेत, पण प्रत्यक्ष रणभूमीवर त्यांचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा याबद्दल फारसा कोणी विचार करत नाही. एक उदाहरण द्यायचे झाल्यास अटलांटिक महासागरात नाझी पाणबुड्या दोस्तांची जहाजे बुडवत निघाल्या होत्या. त्यांचा नाश करायचा तर आकाशातून ती हेरून त्यांच्यावर हल्ले करणे आवश्यक होते. तुमच्याकडे समजा काही विशिष्ट संख्येने विमाने आहेत, आणि परत एकदा तेल भरण्यापूर्वी ते काही मर्यादित मैलच आकाशात उड्डाण करू शकतात. अशी परिस्थिती असताना या पाणबुड्यांना शोधण्यासाठी ज्याप्रकारे विमानांच्या उड्डाणांचे नियोजन करावे लागतील, त्यांना जास्तीत जास्त पाणबुड्यांचा शोध घेता येईल आणि कमीत कमी इंधन वापरून. हे कसे करायचे? गणितज्ञांनी हा प्रश्न हाताळला आणि आणि गणिती भाषेमध्ये हे सांख्यिकीचा आणि संभाव्यतेचा उपयोग करून बिनचूक उत्तरे शोधून काढली. या विज्ञानाला ऑपरेशन्स रिसर्च म्हणतात. गणिताचा वापर करून वस्तू किंवा विमाने यांच्या कार्यक्षम पद्धतीने हालचाली ठरवणे हे गणिती तत्त्व नंतर युद्ध काळामध्ये हे खूप वेगवेगळ्या या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वापरले गेले. शत्रु राष्ट्रावर नेमका कुठल्या शहरावर कुठे बाँबहल्ला करावा यापासून ते एखाद्या कारखान्यात प्रॉडक्शन लाईन मधून तयार झालेल्या वस्तू कार्यक्षम पद्धतीने त्यांचे वाटप किंवा वितरण कसे करता येईल? आज देखील या प्रकारचे तंत्र हे वॉलमार्ट किंवा अॅमेझॉनसारख्या या जगड्व्याळ सप्लाय चेन मध्ये वापरले जाते.
सैनिकहो, तुमच्यासाठी…
युद्धकाळात केवळ शास्त्रज्ञ गणिती आणि अभियंते यांनी गणित आणि विज्ञानाचा वापर केला असे नव्हे तर साधारण सैनिक, नाविक, वैमानिक यांना देखील प्रत्येक वेळेला गणित आणि विज्ञानाच्या वापर कसा करावा हे शिकवले जात असे. तोफा डागण्यासाठी नेमक्या अंतराचा अंदाज करणे, नकाशे वाचणे, होकायंत्राचा वापर करणे, वाऱ्याचा वेग आणि आणि त्याची उंची नेमकी ठरवणे, टायमर लावणे आणि इतरही अनेक कार्यांसाठी गणित आणि विज्ञानाचे मूलभूत नियम माहीत असणे आवश्यक होते. विमान उडवत असताना त्याला दिशा देणे किंवा जहाज आणि पाणबुड्या यांचा मार्ग ठरवणे, रडार सिग्नल्सचा अर्थ जाणून घेणे यासारखी अधिक अवघड कार्यांनादेखील खूप तीव्र प्रशिक्षण आवश्यक होते. अगदी सैन्यातील स्वयंपाक्यांना देखील गणित येणे फार महत्त्वाचे होते. हजारो लोकांच्यासाठी अन्न शिजवणे म्हणजे त्यातील अन्नपदार्थांचा नेमका अंदाज, नेमके प्रमाण शोधून काढणे, लागणारा वेळ किती असेल हे शोधून काढणे आणि त्यावर आधारित असा वेळेवरती अन्न तयार करण्यासाठी कार्यक्रम निश्चित करणे हे सगळे गणिताशिवाय शक्य नाही. साधारण सैनिकाला कदाचित अणुबाँब कसा काम करतो हे ठाऊक नसेल – त्याची गरज देखील नव्हती – पण रोजच्या विविध कार्यासाठी गणित आणि विज्ञान असे वापर करणे हुशारीने वापर करण्यामुळे प्रत्यक्ष रणक्षेत्रामध्ये खूप फरक पडू शकतो हे माहीत असणे आवश्यक होते.
मनुष्यत्वाला काळिमा !
दुसऱ्या महायुद्धात दुर्दैवाने गणित आणि विज्ञानाचा अमानुष असा उपयोग झाला. नाझ्यांनी केलेल्या हत्याकांडात साठ लक्ष ज्यू आणि कितीतरी लाख कम्युनिस्ट या जर्मन राज यंत्रणेला नको असलेल्या लोकांचे हत्याकांड केले गेले. मानवी इतिहासातील सगळ्यात घृणास्पद गुन्हे म्हणून त्याची नोंद आहे. हे घडवून आणणारे लोक स्वतःला रानटी समजत नव्हते. ‘विज्ञाना’चा एका बाजूला ‘शास्त्रीय’ आधार घेऊन गोर्या आर्यन वंशाचे इतर लोकांच्यापेक्षा अधिक श्रेष्ट असे सिद्ध करायचे प्रयत्न चालू होते. त्यांची गणती करणे, वर्गीकरण करणे या गोष्टी शास्त्रज्ञ लोक करत होते! वेगवेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक सिद्धांत यासाठी पुढे केले जात. (नंतर हे सिद्धांत पूर्णपणे चुकीचे होते हे दाखवण्यात आले, ही गोष्ट वेगळी!) युरोपातील या लोकांची हत्या घडवून आणायचे ठरवले गेले. या गोष्टी पार पाडण्यासाठी त्यांनी फॅक्टरी मधल्या औद्योगिक पद्धती वापरायचे ठरवले. ‘मास प्रोडक्शन’च्या ऐवजी ‘मास डिस्ट्रक्शन’ अशी संज्ञा इथे वापरता येईल! वस्तुतः मेडिकल प्रोफेशन हे विज्ञानात अतिशय कनवाळू या पद्धतीचे प्रोफेशन मानले जाते, पण त्याचाही उपयोग युद्धकैद्यांवरती आणि नागरिकांवरती भयानक प्रयोग करण्यासाठी म्हणून करण्यात आला. नाझ्यांनी नवीन रॉकेट आणि क्षेपणास्त्रे यांचा उपयोग शत्रूदेशांतील नागरिकांवर हल्ले करून, त्यांना घाबरवून शरण यायला भाग पाडण्यासाठी म्हणून केला. यांमध्ये शक्ती व्यय करण्याऐवजी ती शक्ती युद्ध करण्यासाठी खर्च केली असती तर कदाचित दोस्त राष्ट्रांच्या विरोधात जास्त संघर्ष केला असता. आपल्या देशातही हे घडवून आणण्याचे मनसुबे असणारे लोक सध्या सत्तेत आहेत.
सारांश म्हणून आपल्याला असे म्हणता येईल की दुसरे महायुद्ध हे उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलेले पहिले युद्ध होते. नवनवीन तंत्र वापरून केलेले युद्ध! अणुबाँब हे यातील सगळ्यात जहाल उदाहरण, पण त्याचप्रमाणे इतर छोटी छोटी हजारो उदाहरणे देता येतील. गृहोपयोगी वस्तूंपासून ते नवीन तंत्रज्ञान प्रशिक्षित करणारे शेकडो फिल्म्स इथपर्यंत या सगळ्या गोष्टींनी युद्धाला हातभार लावला. या महायुद्धाचा-युद्धकालीन शोधांचा परिणाम दीर्घकाळ दिसून आला आहे. आणि आजच्या घडीलादेखील तो वापर होतोच आहे. देशातदेखील वैज्ञानिक आणि अभियंत्यांची बुद्धी वापरून राष्ट्रीय प्रश्नांची सोडवणूक करायचा प्रयत्न केला जातो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात निर्माण केलेल्या हजारो गोष्टी आतादेखील आपल्या या दैनंदिन आयुष्यवरती प्रभाव गाजवताना दिसतात. प्लास्टिकच्या पिशवीपासून कॉम्प्युटर आणि प्रचंड प्रमाणात तयार होणाऱ्या आणि वितरित होणाऱ्या औद्योगिक उत्पादनापर्यंत अगदी आपली शैक्षणिक पद्धतीदेखील – आपल्या जनतेला नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा हे शिकवणे- त्या दिशेने चालते आहे. कधीकधी असे वाटते ही आपली शक्ती वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी शक्ती ही विध्वंसक कार्यासाठी वापरली जाते, ही किती दुर्भाग्याची गोष्ट आहे! पण आपल्याला आवडो अथवा न आवडो, आजघडीला तंत्रज्ञान आणि युद्ध प्रचंड प्रमाणात एकमेकात गुंतलेले आहेत, हे खरे. युद्धोत्तर काळानंतर सोविएत रशियाने याच प्रकारे शिकलेल्या वैज्ञानिक आणि गणिती तत्त्वांचा उपयोग न भूतो न भविष्यति अशा प्रकारे झपाट्याने जनतेचे राहणीमान उंचावण्यासाठी केला, ही गोष्टदेखील विसरता येणार नाही.
चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक!
विज्ञान, गणित आणि तंत्रज्ञान यांची क्षेत्रे विस्तारत असताना ती केवळ एका देशापुरती किंवा युद्धात गुंतलेल्या एका बाजूपुरती मर्यादित राहत नाही. दुसऱ्या महायुद्धात विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील प्रगतीने युद्धात गुंतलेल्या दोन्ही बाजूंना मदत केली. दोन्ही बाजूंनी आपापली राष्ट्रीय सामुग्री ही नवीन आणि अधिक कार्यक्षम शस्त्रास्त्रे बनवण्यासाठी, तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी, युद्ध करण्यासाठी, दळणवळणामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी, औषध निर्मितीसाठी, खाद्य सामुग्रीसाठी, संदेशवहनासाठी वापरली. विज्ञान आणि तंत्रज्ञान स्वतः त्यांचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करायचा, वाईट गोष्टींसाठी हे ठरवत नाही. ते ठरवतात, त्या लोकांच्या- शासनकर्त्यांच्या- इच्छा. प्रत्येक पिढीने वारंवार हे तपासून पाहायला हवे की विज्ञान आणि गणित हे योग्य रीतीने वापरले गेले आहेत किंवा नाहीत, जाताहेत किंवा नाही!
अंतिमतः युध्दाला नकार हेच आपले लक्ष्य असले पाहिजे. परंतु मुख्यतः साम्राज्यशाही माणसावर युध्द लादल्याशिवाय तगू शकत नाही. त्यामुळे ‘युध्द नको, शांतता हवी’ हीच आपली घोषणा असली पाहिजे. साम्राज्यशाहीच्या कारवायांनी युध्द लादल्यास आपल्याला त्यापासून पळवाट काढता येत नाही. शस्त्रसज्जतेसाठी राज्यकर्ते विज्ञान-तंत्रज्ञानाचा सतत वापर करत असतात. पण केवळ शस्त्रसज्जतेने देशाचे रक्षण करता येत नसते. ज्यांचे रक्षण करायचे त्या जनतेला सुरक्षित जीवनाची हमी हवी. त्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञानच नव्हे, तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत करावी लागते. त्यातून निर्माण झालेल्या उत्पादनाचे न्याय्य वाटप करून जनतेला समर्थ करावे लागते. मुख्य म्हणजे राष्ट्र संकल्पना सर्वच नागरिकांचा बंधुभाव आणि त्यांची अभेद्य एकजूट यावर आधारलेला हवी. ही एकजूट जागती ठेवणं, हीच राष्ट्राच्या सुरक्षेची खरी हमी असते.
*
(सदर लेख हा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), महाराष्ट्र राज्य कमिटीचे साप्ताहिक ‘जीवनमार्ग’ यामधून घेतला आहे.)
जीवनमार्ग बुलेटिन : १६०
सोमवार, ७ सप्टेंबर २०२०
संपादक: उदय नारकर
वाचा
दुसरे जागतिक महायुद्ध – लेखमाला
जीवनमार्ग
आज दिनांक
कार्यकर्ता
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी