डमीचा बोका पडला आजारी
झोपला मांडीवर भर दुपारी !
डमीची ऊब त्याला वाटली बरी
झोपवून त्याला अवघडली बिचारी !
झोपवता झोपवता लागला डोळा
डमीच्या स्वप्नांत अंक आला सोळा!
सोळा म्हणाला मी खूप भोळा
माझा पाढा एक रुपया तोळा !
सोळाच्या पाढयाने दिला तिला टोला
स्वप्नांतच डमी झाली लोळागोळा!
तिला पाहून उठला आजारी बोका
धूम ठोकून त्यानं दिला तिला धोका !
– अमृता…
*
वाचा
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.