लालमलाल ड्रेस
शुभ्र दाढी मिशी
गोलू मोलू पिशवी
लांबच लांब केस
डमीला भेटला
नाताळचा सांता
त्याने तिला दिला
खाऊचा भाता
त्याला पाहून
झाली ती खूष
मिठीत घेऊन
लाजली खूप
सांता होता
खूपच हुशार
त्यानं दिला
हास्याचा तुषार
लाडू करंज्या
शेव चकली
डमीची झाली
गंमतच भारी
जाता जाता
सांता म्हणाला
नाताळ आजोबा
म्हणतात मला
प्रत्येक वर्षी
येईन नक्की
आपली मैत्री
राहील पक्की
– अमृता…
वाचा
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.