पाऊस

पाऊस…
गोल गिरक्या घेताना
दोन वेण्यांवर, रिबिनींवरून
फ्राॅकवर
टपटप नाचणारा…
पाऊस…

चाफ्यावरून घरंगळणारा
किशोरीच्या पावलातील
भिंगरी झालेला
रिमझिम रिमझिम
पाऊस….

गालांवरचे गुलाब खुडणारा
फुलपंखी स्वप्ने दाखविणारा
भुरभूर भुरभूर
पाऊस….

धीरगंभीर….
पुरंध्रीसारखा
सोशिक, समंजस
नभ पेलणारा, एकलयी
सरसर सरसर
पाऊस…

दूरवरून सुदूर आलेला
थकला शिणला…
लांबवर विसावून
क्षीण झालेला…
टपटपत निरवलेला
पाऊस….

*

वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता

कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी


+ posts

मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.

1 Comment

  1. Avatar

    सुंदर

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :