महाराष्ट्र माझा श्वास

bhavana-durve-marathi-kavita-maharashtra-majha-dhyas-1-may-chitraksahre

मर्द रांगडा हा देश, महाराष्ट्र माझा श्वास
भारताचा शिरोमणी, जनमानसाचा ध्यास
सह्यगिरीच्या कातळातील, झुळझुळणारे नद्याझरे
खळाळणाऱ्या धमन्या, याच्या सिंधुसरिता उणे-पुरे
थाप डफावर संगीत शाहिरी, मानाचा हा तुरा
धगधगत्या ज्वालांत, गर्जतो क्रांतीचा हा नारा
गडकोटांच्या खिंडारातून, शिवरायांच्या शौर्यकथा
स्वराज्याच्या लढवय्यासम, होणे न कोणी आता
महाराष्ट्र जय महाराष्ट्र, बोल असे बहुमोलाचे
भारत भू चा विशाल तारा, कुणी न याच्या तोलाचे
संत महंते पावन केली, माय मराठीची वाणी
संथ वाहते गोदावरी, कृष्णा-कोयनेचे पाणी
सुजलाम सुफलाम भूमीवरती, महाराष्ट्र विलसत राही
ध्वज तिरंगा लहरत राही, आकाशी तो पाही
भारत मातेच्या भाळावरती, तिलक रूपेरी हा तारा
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र, हा एकमेव अमुचा नारा

– भावना दुर्वे

*

वाचा
भावना दुर्वेंचं साहित्य
दोन मुलांची गोष्ट । दिलीप लिमये
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा
चित्रकथा
कविता


+ posts

भावना प्रशांतकुमार दुर्वे या साहित्यप्रेमी असून त्यांना काव्य आणि गीतरचना, साहित्यलेखन, पर्यटन, लोकजीवन, ग्रामीण जीवन,निसर्ग आणि लहान मुलांचे भावविश्व यांची विशेष ओढ आहे. त्या कोल्हापूरच्या रहिवासी असून निवृत्त शालेय शिक्षिका आहेत.

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :