पुनश्च

chitrakshare-marathi-kavita-anuya-kulkarni-chaitra-punashcha-winston-chen-unsplash

यंदा पानगळतीतच
ठरवलं होतं,
फुलायचं नाही या चैत्रात
पण अवतीभवतीचे सगळेच फुलले
एकेका झाडाने तर कात टाकली होती
त्यांच्यातीलच एक होण्यासाठी
मग मलाही थोडे फुलावे लागले…
थोडे थोडे करता करता, सारे अंग
हिरवे झाले…
भविष्यातल्या जखमांना
मी सजवीत गेले
स्वतःवरती
पुनश्च पानगळती
पुनश्च जखमा
पुनश्च पानगळती
पुनश्च जखमा…

– अनुया कुलकर्णी

*

वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता

कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची – गीतांजली जोशी
‘महाडचे दिवस’ – कादंबरी


+ posts

मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.

1 Comment

  1. अनुया अप्रतिम कविता. निसर्गाचे मानवी करण झाले की बाईची वेदना फचलली? की दोन्ही एकमेकात मिसळून गेले….

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :