खेळ

तुझ्याकडे पाऊस पडतोय
तर माझ्याकडे कडकडीत ऊन
तू पाठवतोस तुझ्या पावसाचं चित्र
मीही मग माझ्याकडचं ऊन पाठवते
तू पाठवलेला पाऊस मी अनुभवते
जणू काही तुझ्या अंगणात मी भिजते
छोट्याछोट्या हिरव्या कुड्या बघते
आणि दवबिंदू होऊन त्यांवर चमकते
मी पाठवलेलं ऊन तू झेलतोस
माझ्या कवडश्यात तू तापतोस
पिवळ्यापिवळ्या झळा अनुभवतोस
आणि किरण बनून माझ्यावर पसरतोस
तुझ्या पावसाच्या चित्रात किती आहे ताकद
माझ्याही ऊनचित्रांत बघ किती आहे चमक
दोघेही विरुद्ध टोकावर असलेलो युगुल आपण
खेळुयात जरा ऊन-पावसाचा रसरशीत खेळ..
चालेल ना तुला?
मेसेज करून सांग मला!

*

वाचा
कविता

शब्दांची सावली: अमृता देसर्डा
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
‘महाडचे दिवस’
– कादंबरी
कथा


Website | + posts

अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.

3 Comments

  1. अशोक थोरात

    व्वा !

  2. अनुया कुलकर्णी

    आहा! क्या बात है! फारच सुंदर कविता! अमृता, लिहित रहा प्लीज!

  3. Avatar

    Khupach chan. Amruta keep it up. All the best

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :