माझ्या कवितेच्या कागदाची होडी
तुझ्या दारातल्या पावसाच्या पाण्यात
एकदा तरी पाठवावी म्हणते…
जमलंच तुला, तर उचल माझी होडी
आणि वाच त्यावर लिहिलेल्या ओळी
माझ्या धोबड अक्षरातल्या भावना
एकदा तरी बघ वाचून!
ओल्या फिस्कटलेल्या कागदी ओळी
वाचून बघ समजते का काही तुला
त्यातल्या अक्षरांची ओढ जरा?
एकदा तरी घे जाणून!
तुझ्या दारातल्या पाण्याचा स्पर्श
माझ्यातल्या तरलतेला झाला ना,
की मी वाहत जाईन पुढेपुढे
एकदा तरी घे समजून !
माझ्या कवितेच्या कागदाची होडी
तुझ्या दारातल्या पावसाच्या पाण्यात
एकदा तरी पाठवावी म्हणते..
*
वाचा
कविता
शब्दांची सावली: अमृता देसर्डा
डोंगराळलेले दिवस – ट्रेकिंगचे अनुभव
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
कथा
अमृता देसर्डा सारद मजकूरच्या कार्यकारी संचालिका असून कवयित्री, कथाकार आहेत.
व्वा क्या बात है