मुळातून हाका येती
परतवू नये बाई,
हृदयाच्या मागे सले
गंधाळली जाई
उडालेल्या ऋतूमध्ये
पाचोळ्याचे पाप
देठापाशी कोंब फुटे
निष्पापाचे माप
आभाळात बाहुलीने
सांगावा धाडला
ऋतु परतीचा सरे
गर्भारी भोंडला
कोय फुटे कवटीची
नवीनच घोषा,
नवी दिशा आकाशाची
सावलीला आशा
*
वाचा
अनुया कुलकर्णी यांच्या कविता
कविता
कथा
४२, विजयनगर : दौलत आठवणींची
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
मी अनुया कुलकर्णी. साक्षर गृहिणी आहे. ‘सोवळी नदीची काया' हा माझा कवितासंग्रह अक्षर मानव प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे.
अनुया सुंदर रचना.
खूप छान. 👌👌👌👌