सवार लू…!

chitrakshare-rama-jadhav-aaj-dinank-hindi-film-lootera-sawar-loo-william-sydney-porter-o-henry
लुटेरा (२०१३)

आज ‘विल्यम सिडनी पोर्टर’चा जन्मदिवस, असं म्हंटलं तर अनेकांना कळणार नाही. त्याचं टोपण नाव किंवा पेन नेम आहे ‘ओ. हेन्री’. हे नाव घेतलं तर लगेच कळेल. इंग्रजी वाङ्मयात ओ. हेन्रीचं महत्वपूर्ण स्थान आहे. खास करून त्याच्या लघुकथा.

कथानक, पात्रं, घटना आपलं लक्ष असं काही लक्ष वेधून घेतात की आपण त्यात पूर्णपणे गुंतून जातो. भावपूर्ण, अनपेक्षित शेवट हे त्याचं वैशिष्ट्य. आपण कथेतून स्वतःला पटकन सावरू शकत नाही.

chitrakshare-rama-jadhav-aaj-dinank-lootera-sawar-loo-william-sydney-porter-o-henry
ओ. हेन्री

ओ. हेन्रीच्या कथा एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला लिहिल्या गेल्या आहेत. ‘द गिफ्ट ऑफ मगाय’, ‘कॉप ॲन्ड द अन्थेम’, ‘द लास्ट लीफ’ या त्याच्या काही सदाबहार कथा आहेत. 

‘लुटेरा’ बद्दल थोडंसं…

‘द लास्ट लीफ’ १९०७ ला पहिल्यांदा प्रकाशित झाली. या अप्रतिम कथेवर अनेक नाटक, सिनेमे इत्यादी बनले. अनुराग कश्यप, शोभा-एकता कपूर आणि विक्रम बहल निर्मित, विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित ‘लुटेरा’ याच कथेवर आधारित आहे. एक सुरेख ऍडाप्टेशन म्हणता येईल. १९५० सालच्या बंगालचं सुंदर चित्रीकरण व साजेसं ‘आर्ट डिरेक्शन’ यामुळे हा चित्रपट अतिशय वैशिष्ट्यपूर्ण झालाय.

२०१३ ला प्रदर्शित झालेल्या या सिनेमात मुख्य कलाकार आहेत रणवीरसिंह आणि सोनाक्षी सिन्हा. अमिताभ भट्टाचार्य यांचं लिरिक्स व संगीत; आणि पार्श्वसंगीत आहे अमित त्रिवेदीचं. चित्रपटाचं संगीत हा खूप मोठा प्लस पॉईंट आहे. अतिशय सुंदर गाणी आहेत. सिनेमॅटोग्राफर आहेत महेंद्र जे.शेट्टी.

एक खोटा आर्किओलॉजिस्ट – वरुण श्रीवास्तव (रणवीरसिंह), माणिकपूर नावाच्या एका गावात येतो आणि तिथल्या जमीनदाराच्या मुलीच्या – पाखीच्या (सोनाक्षी) प्रेमात पडतो. पाखीचं लेखन आणि वरुणचं पेंटिंग या कलांमागे दोघांचं प्रेम फुलू लागतं. पण फसवेगिरी आणि दुःख आड येतात. पुढील कथा पडद्यावरच पाहावी. आणि हो, मूळ कथा जरूर वाचावी. खूप खूप बोलकी आहे, एखाद्या चित्राप्रमाणे रेखीव आहे. एक रंग भरलेली शोकांतिक प्रेमकथा आहे.

पुन्हा एकदा ओ. हेन्रीच्या आठवणीत स्वतःला ‘सवार लू…!’

*

वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
आज दिनांक..
चित्रपटविषय लेख
चित्रकथा
कथा
कविता


+ posts

'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..

1 Comment

  1. अनुया कुलकर्णी

    आवडलेल्या सिनेमांपैकी हा एक! सवाँर लूं गाणे तर ऑलटाईम ग्रेट, एव्हरग्रीन!!

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :