पावसाचा निबंध

तो म्हणतो.. कल्पना सुचते कशी माहीत नाही; पण एखादी कल्पना बऱ्याच काळासाठी आपल्यासोबत असते तरीही तिचा कंटाळा येत नाही. ‘पावसाचा निबंध’ची कथा अशीच त्याच्या म्हणजे नागराज मंजुळेच्या मनात बऱ्याच काळासाठी होती आणि मग आला लघुपट, ‘पावसाचा निबंध’!

राष्ट्रीय पुरस्कार मिळाला यातील दिग्दर्शन आणि साउंडसाठी. संततधार पावसातील एक वास्तविक धारा. शाळेत पावसावरती निबंध लिहायला सांगितला आहे. प्रत्येकाचा पाऊस वेगळा. एक छोटासा मुलगा.. त्याचा पाऊस कसा आहे? वर्गातील कुणाला पाऊस धारांचे कौतुक वाटतं, कधी कोणी चहा पीत पावसाचा आस्वाद घेत आहे.. कोणाला हिरवे हिरवे गार गालिचे दिसतात.. पण लघुपटातल्या मुलाचा पाऊस परिस्थितीमुळे वेगळा, खूप वेगळा आहे. बाप दारू पिऊन पडला आहे, आई गुरं हाकत आहे, त्रासली आहे. तिचा नवऱ्यावरचा राग मुलांवर निघतो आहे…

सहसा पाऊस म्हणजे रोमॅंटिक! पाऊस म्हणजे चहा-भजी! पाऊस म्हणजे हिरवाई, झुळझुळ पाणी! पण इथं पावसाचा निबंध कोरा आहे. वाहतं काही वेगळंच आहे…

अतिशय सुन्न करणारा असा हा पावसाचा निबंध, पावसाच्या थंडीत भिजून बधीर करून टाकावा असा. हा लघुपट झी5 वर उपलब्ध आहे. नक्की पाहा.

*

वाचा
रमा जाधव यांचं साहित्य
चित्रपटविषय लेख
चित्रकथा
कविता
कथा


+ posts

'चित्रपट' हा रमा जाधव यांचा श्वास आहे. चित्रपट बघणं, त्यावर व्यक्त होणं त्यांना आवडतं..

1 Comment

  1. अनुया कुलकर्णी

    नक्की पाहीन

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :