पत्त्यांवर चित्रं यायची आधी
राजा, राणी, इ.
आणि
असायची राजकन्या…
पत्ता सरळ पकडला की हसरी
उलट केला की
पाणावलेली राजकन्या…
तशीच तू
(हिंदोळ्याच्या कड्यांसारखी)
फक्त
चित्र सरळ उलट करणारे हात
ते तुझेच राहु दे…
– सुदेश इंगळे
***
वाचा
सुदेश इंगळे यांच्या कविता
कविता
‘महाडचे दिवस’ – कादंबरी
‘बायजा‘ – कादंबरी
कथा
सुदेश इंगळे यांचा 'उगाच काही तरी' (२०१५), 'काळया ठिपक्यांचं सोनेरी काळवीट' (२०१८) आणि 'निम्म्या रेषांचा अपरिग्रह' (२०२०) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. सध्या ते 'परिसर फाउंडेशन' ही संस्था चालवत आहे. ही संस्था उस्मानाबादमधील ग्रामीण भागात शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'च्या उस्मानाबाद कमिटीचा मी अध्यक्ष असून त्यायोगे विद्यार्थी चळवळीशीदेखील जोडलेला आहे.