महाडचे दिवस ६५: रिंगण
कातकरी बायका-पुरुष सणासुदीला घालतात तसे कपडे घालून आमची वाट बघत उभे होते. साहेब येताच ओळीनं सगळे त्यांच्या पाया पडले. कुठल्यातरी देवाचा मुखवटा आणि बत्ती मध्ये ठेवून त्याभोवती गोल करून उभे राहिले. एक ताशा आणि डालडाचे डबे हातानं आणि काठीनं घुमायला लागले. रिंगण लय पकडत फिरायला लागलं.Read More →