chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-5-jalata-ingal-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

सतत ‘यडं पोर, यडं पोर’ म्हणून तिनं हिणवत आलेल्या बाळूला जणू काही निसर्गच न्याय देत होता. म्हातारी डोक्यानं हल्लक होत चालली होती. आजुबाजुची लोकं तिला ‘यडी म्हातारी’ म्हणून संबोधू लागली होती. तिची जीभ जहरी होत चालली होती. राम तिचं जहर ऐकूनही गप्पच रहात होता. पण हे कुठपर्यंत?Read More →

marathi-kadambari-bayja-4-pangal-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

बायजाचा नवरा दारू, बिडी, तंबाखू या व्यसनांमुळं थकल्यासारखा वाटायचा. तब्येतही खंगल्यासारखी झाली होती. बिडीचा झुरका घेतल्याबरोबर त्याला ढास लागे पण बिडी ओढल्याशिवाय त्याला जमत नव्हतं. कामही फार होत नसायचं. जवळ बसलेल्या माणसाला त्याच्या छातीतून येणारा घरघर आवाज स्पष्टपणे ऐकायला येई. सवतीला कामाची सवय नव्हती. धसाकसाची कामं करण्याशिवाय बायजाच्या नवऱ्याला आणि सासूला पर्याय नव्हता.Read More →

marathi-kadambari-bayja-3-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

वावटळ आली की, खोपटाच्या झावळ्या आकाशात झेप घेऊ बघत. ती मेढी हातानं थांबून धरे. विजा लवू लागल्या की, घाबरणाऱ्या लेकरांना एखाद्या पक्षिणीसारखी पंखांखाली घेई. रात्रभर तिच्या डोळ्याला डोळा नसे. कुडामेढीचं तिचं खोपट अंगावर पडतंय की काय अशी तिला भीती वाटे. कधी कधी बाळूच्या तोंडून विचित्र, मोठमोठ्यानं आवाज निघत. ती धावत बघायला जाई तर त्याच्या उशाशेजारी काळ्या पाठीच्या विंचवाचं बिऱ्हाड आलेलं असे.Read More →

marathi-kadambari-bayja-dr-kshama-shelar-govardhane-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-a-sip-of-poem

बायजानं पोराचं नाव ‘बाळू’ ठेवलं होतं. आयूष्यभर तो बाळच राहणार होता आणि तिच्या आईपणाची सत्वपरीक्षा पाहणार होता, हे तिनं नकळतपणे अधोरेखित करून टाकलं. बाळूच्या बरोबरीची पोरं पावलं टाकू लागली पण बाळू नुसताच निपचित आढ्याकडं बघत बसलेला असायचा. तोंडातून लाळ गळत असायची. त्यावर माशा भणभणायच्या. पण बायजा कामातून मोकळी झाल्याशिवाय त्या कुणी वारतही नव्हतं.Read More →

bayja-marathi-kadambari-chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-dr-kshama-shelar-govardhane-feministic-strivadstriwadi

दुःखाची मूळाक्षरं आधीपासूनच गिरवत असल्यासारखी समजूतदार बायजा पडेल ते काम करत धाडकन अंगावर पडलेला संसार नावाचा उपद्व्याप पैसाभर कुंकवाच्या आणि निळ्या-जांभळ्या व्रणांच्या बदल्यात निमूट करत होती. कधीतरी जलम आला आणि शरीरात काही तरी नवीन रूजलंही. त्या गोष्टीचा ना तिला आनंद होता, ना दुःख. नुसतंच भांबावलेपण…Read More →

Mahadche-divas-chapter-69-chitrakshare-deepak-parkhi-marathi-kadambari

गच्चीमध्ये स्टूल टाकून आकाशाकडं एकटक बघत राहिलो. लहानपणी मी आकाशाकडं असंच पहायचो, तेव्हा मनात एखाद्या प्राण्याचा आकार आणायचो आणि ढगांच्या मांदियाळीत मला तोच आकार दिसायचा. आता ढगात मला अपॉइंटमेंट लेटर दिसलं.Read More →

mahadche-diwas-68-marathi-kadambari-kramashah-deepak-parkhi-chitrakshare-mrutyunjay

खोलीची अवस्था बिकट होती. रात्री झोपायला मी बर्वेकाकांकडं गेलो. त्यांच्याकडं झोपायची वेळ कधीच आली नव्हती. काका-काकू आणि मी पाच-तीन-दोन खेळत बसलो. सकाळी उठलो तेव्हा वाटलं आपण काकांच्या कुशीतून जागं झालोय…Read More →

mahadche-diwas-67-marathi-kadambari-lekhak-deepak-parkhi-chitrakshare

मी पाहिलं, बाहेरच्या पॅसेजमध्ये उघडणाऱ्या खिडकीच्या काचांवर ब्राऊन पेपर चिकटवला होता. याचा अर्थ शहापूरकरनं नवदांपत्याचं खाजगीपण जपण्याची तयारी सुरु केली होती. त्याचबरोबर मी दुसरीकडं जायला तयार असल्याची खात्रीही बाळगली होती. आपल्याला कुणीतरी इतकं गृहीत धरलं की त्रास होतोच.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-deepak-parkhi-mahadche-diwas-66-shifaras-patra-recoomondation-letter-

बहुतेक घरी कुणी ना कुणी माणूस मिलिट्रीमध्ये असतो. वर्षभर तो बायकोपासून दूर असतो. रजा मिळाली तर दोन महिने गावी येतो. स्त्रीसुख न मिळाल्यानं आधाशासारखं तो या रजेच्या काळात घेत राहतो. बायकोलाही त्याची गोडी लागते. आणि त्याची रजा संपते. तो ड्युटीवर जॉईन होतो. रोज लागलेली गोडी ती बायको विसरू शकत नाही. तिची वाढलेली भूक तिला चैन पडू देत नाही.Read More →

mahadche-diwas-65-deepak-parkhi-marathi-kadambari-read-on-chitrakshare-content-writing-firm-saarad-majkur-pune

कातकरी बायका-पुरुष सणासुदीला घालतात तसे कपडे घालून आमची वाट बघत उभे होते. साहेब येताच ओळीनं सगळे त्यांच्या पाया पडले. कुठल्यातरी देवाचा मुखवटा आणि बत्ती मध्ये ठेवून त्याभोवती गोल करून उभे राहिले. एक ताशा आणि डालडाचे डबे हातानं आणि काठीनं घुमायला लागले. रिंगण लय पकडत फिरायला लागलं.Read More →