love-prem-illustration-mayuri-shahane-chitrakshare-chitrakatha-pune-artist-1
प्रेम । मयुरी शहाणे । चित्रकथा

‘या जगात जो तो स्वतःसाठी जगतो. वृक्ष-वेलींची मुळे जशी ओलाव्याकडे वळतात, तशीच माणसेही निकटच्या लोकांचा आधार शोधतात. याला जग कधी प्रेम म्हणतं, कधी मैत्री, कधी प्रीती; खरं तर ते आत्मप्रेमच असतं. एका बाजूला ओलावा नाहीसा झाला की, झाडवेली सुकून जात नाहीत. त्यांची मुळे दुसऱ्या बाजूला कुठे ओलावा आहे, हे पाहू लागतात. मग तो जवळ असो किंवा दूर, तो शोधून ती टवटवीत राहतात.’
– वि. स. खांडेकर

खूप पूर्वी वाचण्यात आलेली वि. स. खांडेकर यांची ही वाक्यं मनात घर करून बसली होती. या वाक्यांचा जगण्यातसुद्धा प्रत्यय येत गेला. किंबहुना जगण्यात प्रत्यय येत गेला, तशी ही वाक्यं आणखीन पटत गेली.
ही वाक्यं मला कशी दिसतात, कशी भावतात, ते रेषांमधून शोधण्याचा हा प्रयत्न.

*


वाचा
चित्रकथा

कथा

कविता
डोंगराळलेले दिवस
– ट्रेकिंगचे अनुभव
शब्दांची सावली (अमृता देसर्डा)


+ posts

मी मयुरी. व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. मी नाशिक चित्रकला महाविद्यालयातून चित्रकलेचं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 'व्हिडीओ प्रोडक्शन'चं शिक्षण पूर्ण केलं आहे. पुढे मराठी 'टीव्ही-फिल्म इंडस्ट्री'साठी विविध कामं केली. जसे की, 'फिल्म्स'च्या कला-वेशभूषा विभागांसाठी काम करणं, 'कौन बनेगा करोडपती' व 'पाणी फौंडेशन' आयोजित 'सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धे'साठी 'फिल्ड डायरेक्टर' म्हणून काम करणं इ.

2 Comments

  1. अमृतवेलची माझी एक खास आठवण आहे. मला ही कादंबरी निबंधलेखनासाठी पारितोषिक म्हणून मिळाली होती. त्याकाळी म्हणजे कॉलेजला असताना अमृतवेल, मृत्युंजय यांची अक्षरशः पारायणं केली होती. 🙂

  2. खूपच सुंदर चित्र आहे!! अतिशय अर्थपूर्ण आहे ! अगदी बोलके चित्र!! खूपच आवडले

आपली मोलाची प्रतिक्रिया इथं नोंदवा :