chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-14-aani-tina-maran-magitala-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

गावातल्या घरी म्हातारी खंगत चालली होती. मनाच्या राज्यात दिशाहीन पांगत चालली होती. लक्ष्मण वेळोवेळी आपली फर्राटेदार मोटार घेऊन तिला व बायजाला भेटायला येत होता. कधी कधी बायकोला व पोरालाही आणत होता. संपत आणि सुरखीचा संसार लोखंडी कांबीसारख्या मजबूत पोरांनी आणि तुळशीसारख्या पोरीनी फुलला होता. बायजाचा मळा कष्टपुर्वक पिकवत त्यांनी पक्क्या घराच्या बांधकामापुरती दोन-एक गुंठे जमीन खरेदी करून त्यावर टुमदार घरही बांधलं होतं.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-13-pathanguli-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

लुगडं फाडून तिची चिंधी बाळूच्या जखमेवर बांधून संपतच्या मदतीची वाट न पाहता तिनं जिवाच्या करारानं बाळूला उचललं आणि त्याला पुढं कित्येक वर्षं जगवण्यासाठी ती निघाली. इकडं सुरखी तटतटल्या कळ भरल्या पोटानं बेजार झाली होती. आई नावाची मासोळी इकडंही तडफडत होती आणि तिकडंही.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-12-surakhiche-dohale-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

बायजा जमेल तसे सुरखीचे डोहाळे पुरवत होती. लेकीशी बोलण्याची तहान सुरखीशी बोलून भागवत होती. काही गरम गरम रांधलं की तिला नेऊन देत होती. फक्त बाळूभोवती फिरणारं तिचं जग तिच्याही नकळत विस्तारू पाहत होतं. मायेच्या धाग्यांमध्ये गुरफटलं जात होतं. बाईपणाच्या नाळेनं दोघी जोडल्या जात होत्या. काळजाच्या अगदी आत लपलेलं, खूपलेलं आणि नकळत जपलेलं कित्येक व्रणांचे क्षण दोघी एकमेकींसमोर उकलून दाखवत होत्या.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-11-ashadhache-diwas-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

आषाढ लागला होता. अशोकाचा, कडूलिंबाचा डेरा हिरवागार झाला होता. त्यांच्या पिकून खाली पडलेल्या फळांना पाखरं झोंबत होती. सिताफळी, लिंबं फळांनी लगडली होती. ओल्या दुष्काळाचं संकट थोडक्यात हुलकावणी देऊन गेलं होतं. पेरण्या झाल्या होत्या. आता लवकरच धान्याचे अंकूर तर्रारून वर येणार होतं.Read More →

chitrakshare-shabdanchi-savli-amruta-desarda-husband-wife-story

‘हाय’‘बोल’‘काही नाही, सहज मेसेज टाकला’.मी तिला घरातली कामे करता करता मेसेज करत होते. तिच्याशी बोलायचं होतं आणि एकाच वेळी डोक्यातली नेहमीची कामे उरकायची होती. त्यात लाईट गेली होती. मोबाईलची बॅटरी कमी होती. बोलता बोलता समोर राहणाऱ्या एक ताई घरी आल्या. बेल वाजली. मी भानावर आले. एका ताटात त्या पोळ्या आणिRead More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-10-maun-akrosh-dr-kshama-shelar-govardhane-marathi-kadambari-vacha-online-1

हळूहळू आठवांचे आणि आसवांचे डोह आटत गेले. बाळू आणि त्याचा दिनक्रम एवढंच तिचं आयुष्य बनून गेलं. मळ्यात कष्ट करून सोनं पिकवण्याची तिची जिद्द आणि उर्जा केव्हाच गंजून गेली होती. फक्त घराजवळचा तुकडा स्वतःला कसण्यासाठी ठेवून बाकीचं वावर अर्धेलीनं देऊन टाकलं.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-9-na-bharanari-jakham-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

बायजा खुळ्यागत तेच तेच जोंधळे पुन्हा पुन्हा खालीवर करत होती. बाळू चिंतावू नये म्हणून गाणी म्हणत होती. तिच्या गाण्यातलं टिपूर चांदणं मात्र काही कुठं दिसत नव्हतं. चोहीकडे काळाभंगार अंधार पसरला होता. पावसाला जोर जरी नव्हता तरी आभाळाचा एकूण रागरंग बघता कुठल्याही क्षणी मुसळधार थेंबाट पडायला सुरूवात होईल, असं वाटत होतं.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-8-balapankha-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online-1

मळ्यातल्या घराला लक्ष्मणाचे पाय लागले तेव्हा तर आपलं घर श्रीमंत झालं की लक्ष्मण गरीब, हे कोडं रामला सुटलं नाही. बायजानं त्याच्यावरून भाकरतुकडा ओवाळून टाकला. कौतुकानं रांधलेलं त्याच्या पानात वाढलं. बायजाईच्या रांधण्याची वाहवा करीत मोठ्या आनंदानं लक्ष्मण भरपेट जेवला.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-7-ram-lakshman-bhet-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

एसटी यायच्या बराच आधी तो जाऊन पोहोचला होता. स्टँडवर असणारी चार-दोन दुकानं नुकतीच उघडू लागली होती. दुकानावरची कामगार पोरं खराटा घेऊन दुकानासमोरची जागा झाडून घेण्यात व्यस्त होती. दूर कुठंतरी पाऊस झाला होता. त्याचा ओला ओला सुगंध वाऱ्यासोबत दरवळत होता. दुकानासमोरच्या जागेत सडा टाकल्यानं तो सुवास अजूनच ताजा झाला होता. पूर्वेला असणाऱ्या दूरवरच्या टेकडीवर असणारं देऊळ मागून येणाऱ्या सूर्यकिरणांनी दैवी प्रकाशत होतं.Read More →

chitrakshare-goshta-creations-saarad-majkur-bayja-6-lakshman-bhetichi-aas-dr-kshama-shelar-govardhane-vacha-marathi-kadambari-online

सोत्ताच्या पैशातलं चारानं-आठानं तरी दाखवती का आपल्याला? आपन काय काईच करत नाई का? बरं तुला बोलती, मला बोलती, दादालाबी बोलती. आपन काय सावत्र हाये का? तसं पाह्यलं तं म्हातारी येका हाताची बी नाई माझ्या. पाहीन तवर पाहीन आन् एखादं दिवशी इकडचं थोबाड तिकडं करून टाकीन.”Read More →