बायजा १४: आणि तिनं मरण मागितलं
गावातल्या घरी म्हातारी खंगत चालली होती. मनाच्या राज्यात दिशाहीन पांगत चालली होती. लक्ष्मण वेळोवेळी आपली फर्राटेदार मोटार घेऊन तिला व बायजाला भेटायला येत होता. कधी कधी बायकोला व पोरालाही आणत होता. संपत आणि सुरखीचा संसार लोखंडी कांबीसारख्या मजबूत पोरांनी आणि तुळशीसारख्या पोरीनी फुलला होता. बायजाचा मळा कष्टपुर्वक पिकवत त्यांनी पक्क्या घराच्या बांधकामापुरती दोन-एक गुंठे जमीन खरेदी करून त्यावर टुमदार घरही बांधलं होतं.Read More →